महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 मराठी : हॉस्पिटल लिस्ट, आजारांची यादी, पात्रता,
red more सरकारी योजनाश्रावण बाळ योजना 2023 महाराष्ट्र माहिती मराठी | Shravan Bal Yojana
![]() |
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना |
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना :-
हि महाराष्ट्र सरकारची मुख्य आणि महत्वाकांक्षी अशी आरोग्य योजना आहे, महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या आहेत, या योजना अत्यंत लोक उपयोगी असून राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांसाठी त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना गरजेच्यावेळी आर्थिक मदत देऊन त्यांच्या जीवनात स्थेर्य निर्माण करण्याच काम या योजनांव्दारे शासन करत असते.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना :- हि अशीच एक आरोग्य योजना आहे, या योजनेंतर्गत राज्यातील गरीब व आर्थिक दुर्बल, वंचित नागरिकांना शासनाने निर्धारित केकेल्या सूचीबद्ध शासकीय / निमशासकीय किंवा धर्मादाय रुगांलयात गंभीर आजारांमध्ये, नागरीकांना या योजनेंतर्गत विमा संरक्षण देऊन मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जातो, याच बरोबर यावेळी संपूर्ण जगामध्ये कोविड -19 करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे तसाच राज्यामध्ये सुद्धा करोना विषाणूचा प्रसार मोठया प्रमाणात झाला होता, त्यामुळे शासनाने या योजनेच्या अंतर्गत, योजनेच्या लाभार्थ्यांबरोबर सर्वच नागरिकांना या करोना महामारीच्या संकटामध्ये नागरिकांवर आर्थिक बोजा पडू नये आणि जनतेला आरोग्य विषयक हमी देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा कालावधी शासनाने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, वाचक मित्रहो आपण या लेखात महाराष्ट्र सरकारच्या या आरोग्य योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे, या योजनेसाठी लागणारी पात्रता, तसेच या योजनेंतर्गत येणाऱ्या आजारांची यादी, अंगीकृत रुग्णालयाची यादी हि संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सामाविष्ट लाभार्थी :- या योजनेंतर्गत अन्नपूर्णा योजना, दारिद्य रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड आणि दारिद्र्य रेषेवरील केशरी रेशनकार्ड ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत आहे असे कुटुंबे, या मध्ये शासकीय आणि निम शासकीय व आयकर दाते या कुटुंबाना हि योजना लागू नसेल. अमरावती आणि औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील आणि वर्धा विभागातील अशा 14 शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील पांढरे रेशन कार्ड असलेली शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी असेल.
या व्यतिरिक्त महिला आश्रमातील महिला, अनाथालय, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक तसेच अधिस्वीकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंब या अधिक वर्गांचे या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या सबंधित प्रशासकीय विभागाकडून या लाभार्थी वर्गांची अचूक आकडेवारी उपलब्ध करून घेऊन लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात येईल आणि या सर्व वर्गातील नागरीकांना या योजनेच्या अंतर्गत विमा संरक्षण उपलब्धता देण्यात येईल.
red more शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र
या योजनेंतर्गत विमा संरक्षण आणि विमा हप्ता :- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विम्याचा हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्शुरंस कंपनीस अदा करण्यात येतो, सदर विमाहप्ता चार त्रैमासिक हप्त्यांमध्ये अदा करण्यात येतो. या योजनेंतर्गत लाभार्थी परिवारास दरवर्षी 2 लाख रुपये प्रमाणे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे, तसेच या योजनेंतर्गत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हि मर्यादा 3 लाख रुपये प्रतीवर्ष इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच लाभार्थी परिवारातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तिंना या योजनेचा लाभ घेता येतो. या मध्ये दात्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश असेल आणि तसेच योजनेंतर्गत रुग्णाला उपचार सुरु होण्याआधी असलेल्या आजारांचाही समावाश असेल.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत असणाऱ्या वैद्यकीय प्रोसिजर्स :- या योजनेमध्ये पूर्वीच्या 971 वैद्यकीय प्रोसिजर्स पैकी अत्यंत कमी वापर असलेल्या प्रोसिजर्स वगळण्यात आल्या असून काही नवीन प्रोसिजार्सचा समावेश करण्यात आलेला आहे. या मध्ये कर्करोग, बालकांवरील उपचार, वृद्धांवरील उपचार (Hip & Knee Replacement), सिकलसेल, अनिमिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, इत्यादी साठी नवीन उपचारांचा समावेश करून रक्तविकार शास्त्र या विशेषज्ञ सेवेसह 31 विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण 1100 प्रोसिजार्सचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला असून या मध्ये 127 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. तसेच 111 प्रोसिजर्स शासकीय रुग्णालयांसाठी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्याकरिता राखीव ठेवण्यात येत आहे
परंतु डोंगराळ भागात / आदिवासी भागात तसेच वर नमूद केलेल्या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये शासकीय रुग्णालयासाठी राखीव असलेले उपचार प्रक्रियांसाठी पुरेशी पर्यायी आरोग्य व्यवस्था उपलब्ध नसल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित केल्यानंतर खाजगी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच सदर उपचारपद्धतीच्या वापराचा वेळेवेळी आढावा घेऊन त्यामध्ये नवीन प्रोसिजर्स वाढविणे किंवा कमी करणे याचा अधिकार नियामक परिषदेस असतील.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लाभार्थ्यांची ओळख प्रक्रिया :- या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची ओळख महाराष्ट्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे योजनेंतर्गत लाभार्थी परिवारास देण्यात येणारे आरोग्य ओळखपत्र किंवा असंघटीत कामगार ओळखपत्र, स्मार्ट कार्ड किंवा राज्य शासनाने निर्धारित केलेल्या इतर कोणत्याही पुराव्याच्या आधारे ओळख पटविली जाईल, त्याचप्रमाणे हे ओळखपत्र मिळेपर्यंत या योजनेंतर्गत लाभार्थी परिवाराकडे असलेले वैध रेशनकार्ड किंवा केंद्र / राज्य शासनाने वितरीत केलेले कोणतेही एक ओळखपत्र जसे आधारकार्ड, मतदारकार्ड, वाहन चालक परवाना, इत्यादी आणि तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील आणि वर्धा विभागातील अशा एकूण 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबासाठी त्यांच्याकडे असलेली पांढरे रेशनकार्ड किंवा 7/12 उतारा यांच्याव्दारे या योजनेंतर्गत उपचार मिळविण्यास पात्र असतील.
या व्यतिरिक्त शासन मान्य असलेल्या आश्रमशाळेतील मुले, अनाथ आश्रमातील मुले, महिला आश्रमातील महिला, वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे त्यांचे कुटुंब इत्यादी लाभार्थी घटकांची ओळख, राज्य शासन निर्धारित करे अशा ओळखपत्राच्या आधारे पटविली जा
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट हॉस्पिटल्स :- या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये 30 पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय किंवा निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे, पात्र लाभार्थी रुग्ण त्यांच्या सोयीनुसार राज्यातील त्यांच्या जवळ असणाऱ्या अंगीकृत रुग्णालयात जाऊन उपचार मिळऊ शकतात. तसेच योजनेमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्यासाठी पूर्वी निश्चित केलेली कार्यपद्धती व मानके कायम राहतील तसेच योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णालयांची संख्या मर्यादित राहणार नाही. डोंगराळ / आदिवासी आणि सर्व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील सर्व रुग्णालयांना योजनेंतर्गत अंगीकृत होण्यासाठी निकष शिथिल करून कमीत कमी 20 खाटांची मर्यादा राहील. या रुग्णालयांचा योजनेमध्ये समावेश करण्याबाबतची कार्यवाही सोसायटी व विमा कंपनी करेल. तसेच या योजनेंतर्गत काही विशिष्ट परिस्थिती मध्ये आणि आवश्यकते नुसार सीमावर्ती राज्यातील शासकीय रुग्णालयांना एका वर्षासाठी योजनेंतर्गत अंगीकृत करण्यात येईल. सरकारी आणि खाजगी रुग्णालयाची कमाल संख्या 1000 असेल
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समाविष्ट नाही :- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत हर्निया, योनी किंवा पोटातील हिस्टेरेकटॉमी, पित्ताशयाची शस्त्रक्रिया, डीसेकटॉमी, इत्यादी या सह नियोजित 131 प्रक्रिया वगळता सर्व स्वीकार्य आरोग्य सेवा खर्च समाविष्ट आहेत. या केवळ सरकारी पेनेलमधील रुग्णालये किंवा सरकारी वैद्यकीय महाविद्यलयात केल्या जातील.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य मित्राची भूमिका :- या योजनेमध्ये समविष्ट असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात लाभार्थी रुग्णांची नोदणी, रुग्णांना उपचारा दरम्यान सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशा प्रत्येक अंगीकृत रुग्णालया मध्ये आरोग्य मित्र उपलब्ध आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत घेण्यात येणारे आरोग्य शिबीर :-योजनेंतर्गत अंगीकृत रूग्णालयाव्दारे तालुका मुख्यालय, प्रमुख ग्रामपंचायती आणि नगरपालिकांमध्ये मोफत शिबीरे आयोजित केली जातील. जिल्हा सनियंत्रण समिती किंवा जिल्हा समन्वयक यांनी सुचविलेल्या ठिकाणी प्रत्येक अंगीकृत हॉस्पिटलव्दारे महिन्याला किमान एक मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले जाते.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना समाविष्ट उपचार
या योजनेंतर्गत 31 विशेष सेवांतर्गत 1100 उपचार व शस्त्रक्रिया आणि तसेच 127 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत खालीलप्रमाणे विशेष सेवांच्या अंतर्गत उपचार आणि सेवा देण्यात येत आहे.
- सर्व साधारण शस्त्रक्रिया
- नाक कान घसा शस्त्रक्रिया
- नेत्ररोग शस्त्रक्रिया
- स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र
- अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
- पोट व जठार शस्त्रक्रिया
- कार्डीओव्हस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
- बालरोग शस्त्रक्रिया
- प्रजनन व मुत्ररोग शस्त्रक्रिया
- मज्जातंतूविकृती शास्त्र
- कर्करोग शस्त्रक्रिया
- वैद्यकीय कर्करोग उपचार
- रेडीओथेरेपी कर्करोग
- त्वच्याप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
- जळीत
- पॉलिट्रामा
- प्रोस्थेसिस
- जोखिमी देखभाल
- जनरल मेडिसिन
- संसर्गजन्य रोग
- बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
- हृदयरोग
- नेफ्रोलोजी
- न्युरोलोजी
- पल्मोनोलोजी
- चर्मरोग चिकित्सा
- रोमेटोलोजी
- इंडोक्रायनोलोजी
- मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
- इंटरवेन्शनल रेडिओलोजी
पात्र निकषांच्या कागदपत्रांची यादी आणि वैध फोटो आयडी यादी :- लाभार्थीच्या फोटोसह आधारकार्ड, आधार नोंदणी स्लीप आधार कार्डचा ओळख दस्तऐवज म्हणून आग्रह धरला जाईल आणि आधारकार्ड / क्रमांक नसतानाही, आधारकार्ड जारी करण्यासाठी स्वीकारले जाणारे कोणतेही कागदपत्र देखील स्वीकारले जातील.
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- ड्रायव्हिंग लायसन्स
- शाळा / कॉलेज आयडी
- पासपोर्ट
- स्वातंत्र्यसैनिक ओळखपत्र
- RGJAY / MJPJAY चे हेल्थ कार्ड
- अपंग प्रमाणपत्र
- फोटोसह राष्ट्रीय बँकचे पासबुक
- जेष्ठ नागरिक केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले कार्ड 12. सैनिक बोर्डाने जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड
- सागरी मत्स्यपालन ओळखपत्र ( महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालय / मत्स्यव्यवसाय विभागाव्दारे जारी केलेले)
- महाराष्ट्र सरकारच्या / भारत सरकारने जारी केलेला कोणताही फोटो आयडी पुरावा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लाभार्थी पात्रता
- महाराष्ट्र राज्यातील संकटग्रस्त असलेल्या जिल्ह्यातील परिवार यो योजनेसाठी पात्र आहे
- केशरी / पिवळे / पांढरे रेशनकार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड किंवा अन्नपूर्णा कार्डधारक या योजनेस पात्र आहे
- अमरावती, वाशीम, औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, हिंगोली, बीड, जालना, नांदेड, लातूर, परभणी, यवतमाळ, उस्मानाबाद, वर्धा या सारख्या अनेक कृषीविषयक अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे
- अर्ज करणारे नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आवशयक कागदपत्र
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी आवशयक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत
- ओळखपत्र म्हणून रेशनकार्ड पिवळे, पांढरे, केशरी, यापैकी कोणतेही किंवा खालीलप्रमाणे कागदपत्र जोडणे आवश्यक आहे
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- चालक परवाना
- मतदार ओळखपत्र
- अपंग प्रमाणपत्र
- छायाचित्रासह राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
- शाळा / कॉलेज आयडी
- शहरीभागांसाठी तहसीलदारचा शिक्का
- पासपोर्ट
- स्वात्यंत्र सैनिक ओळखपत्र
- केंद्र आणि राज्य सरकारने जारी केलेले जेष्ठ नागरिक कार्ड
- सैनिक मंडळाने जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड
- शासनाने जारी केलेला कोणताही फोटो आयडी पुरावा
- मरीन फिशर्स ओळखपत्र
नवीन जन्म झालेल्या बाळाच्या बाबतीत ज्यामध्ये वैध पिवळ्या रेशनकार्ड किंवा केशरी रेशनकार्ड वर मुलाचा फोटो आणि नाव उपलब्ध नसतील अशा परिस्थिती मध्ये केशरी / पांढऱ्या / पिवळे रेशनकार्ड आणि जन्म झालेल्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र व मुलाचा फोटो त्याच्या पालकापैकी एकासह जमा करावा लागेल.
टीप :- सदरच्या नेट कॅफी मध्ये जाऊन फॉर्म भरून घेणे व माहिती घेणे
धन्यवाद 👍
0 टिप्पण्या